बेस्टच्या वीज ग्राहकांना शॉक, १८ टक्के वीजदरवाढ होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 January 2023

बेस्टच्या वीज ग्राहकांना शॉक, १८ टक्के वीजदरवाढ होणार


मुंबई - दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाईने कंबरडे मोडणाऱ्या मुंबईकरांना लवकरच वीजदरवाढीचा झटका बसणार आहे. बेस्टने (BEST) १८ टक्के वीजदरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून तसा प्रस्ताव तयार केला आहे. बेस्टकडून महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) एमईआरसीकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यास एप्रिलपासून वीज बिलात वाढ होऊ शकते. त्यामुळे एप्रिलपासून मुंबईकरांना वीज दरवाढीचा शॉक बसू शकतो.

मुंबईसाठी वीज पुरवठा करणाऱ्या अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरने वीजदरवाढीचा प्रस्ताव दिल्यानंतर आता बेस्टनेही वाढत्या उत्पादन खर्चावर उपाय म्हणून वीजदरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. बेस्टने १८ टक्क्यांपर्यंत वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केल्याने मुंबईकरांच्या वीज बिलामध्ये १८ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यामध्ये घरगुती ग्राहकांसाठी १०० युनिट पर्यंत १८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव असून १०१ ते ३०० युनिट पर्यंत ६ टक्केपर्यंत दरवाढीचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर ३०१ ते ५०० व त्याच्या पुढे दोन टक्के वीज दरवाढीची  शक्यता आहे. बेस्टने राज्य वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, दुकाने, कार्यालये आणि इतर व्यावसायिक आस्थापनांसाठी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक ग्राहकांसाठी बेस्टने ६ टक्के कमी दरवाढीचा प्रस्ताव दिला आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाने हा प्रस्ताव मंजूर केल्यास मुंबईकरांच्या वीजबिलांमध्ये एप्रिल महिन्यापासून वाढ होऊ शकते. 

मुंबई शहरात बेस्ट आणि टाटा पॉवर कंपनीच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येतो. तर, मुंबई उपनगरात अदानी पॉवर, टाटा पॉवर आणि काही भागांमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा करण्यात येतो. महावितरणकडून भांडुप, मुलुंड या भागांमध्ये वीज पुरवठा करण्यात येतो.

सध्या बेस्टचा वीज दर काय?
0 ते 100 युनिट 
सध्याचे दर  - 
2  रुपये 93 पैसे

101 ते 300 युनिट  
सध्याचे दर   - 
5 रुपये 18 पैसे  
 
301 ते 500 युनिट
सध्याचे दर    
7 रुपये 79 पैसे  -

501 ते 1000 युनिट 
सध्याचे दर   - 
9 रुपये 2 पैसे  -

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad