२ जानेवारीपासून निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

२ जानेवारीपासून निवासी डॉक्टरांचे कामबंद आंदोलन

Share This

मुंबई - विविध मागण्यांसाठी राज्यभरातील वरिष्ठ निवासी डॉक्टर आणि पालिका संचालित रुग्णालयातील कनिष्ठ निवासी डॉक्टरांनी सोमवार (२ जानेवारी) पासून कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्यभरातील निवासी डॉक्टर्स सहभागी होणार आहेत. त्यामुळे, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनामुळे सरकारी, पालिका रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

सरकारने ज्येष्ठ निवासी डॉक्टरांसाठी पदे निर्माण करणे, सातव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता, कोविड सेवा थकबाकी, सर्व निवासी डॉक्टरांसाठी योग्य निवास सुविधा यासह इतर प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. मागण्यांबाबत निर्णय होत नसल्याने निवासी डॉक्टरांना समस्यांना सामोरे जावे लागते आहे. राज्यभरातील कनिष्ठ निवासी डॉक्टर हे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारे आहेत, तर वरिष्ठ निवासी डॉक्टर ज्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून ते सरकारी रुग्णालयांमध्ये अनिवार्य एक वर्षाच्या करारानुसार सेवा देत आहेत. या प्रलंबिंत मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्याने निवासी डॉक्टर्सनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अधिका-यांचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे, परंतु त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यामुळे सोमवारी, २ जानेवारीपासून निवासी डॉक्टर्सनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कनिष्ठ निवासी डॉक्टरांचा समावेश असलेल्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट्स संघटनेच्या नेतृत्वाखाली निवासी डॉक्टर्स कामबंद आंदोलन करणार आहेत. 

कूपर रुग्णालय, केईएम रुग्णालय, नायर रुग्णालय आणि सायन रुग्णालयाशी संलग्न कनिष्ठ निवासी डॉक्टर्स आंदोलनात सहभागी होणार आहेत. रुग्णालयातील ओटी व ओपीडीत सेवा न देण्याचा निर्णय डॉक्टर्सनी घेतला आहे. मार्डच्या कामबंद आंदोलनात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ बॉन्डेड रेसिडेंट डॉक्टर्सही (माबार्ड) संपात सामील होण्याची शक्यता आहे. कामबंद आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages