
मुंबई पोलीस दलाचे पहिले विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी काल आपला पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी केलेल्या ट्वीटची चर्चा रंगली आहे. देवेन भारती यांच्यासाठी विशेष पोलीस आयुक्तपदाची निर्मिती केली असल्याची चर्चा सुरू आहे. विशेष पोलीस आयुक्तपदामुळे मुंबई पोलीस दलात दोन सत्ताकेंद्र असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच देवेन भारती यांनी केलेल्या ट्वीटमुळे आणखी चर्चा रंगली आहे.
मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त केलेले आयपीएस देवेन भारती आज पदभार स्वीकारण्यापूर्वी कायदा व सुवव्यस्था विभागाचे जॉईंट सीपी सत्यनारायण चौधरी आणि पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेतली. विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती हे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या अंतर्गत काम करतील. देवेन भारती यांच्या अखत्यारीत आर्थिक गुन्हे आणि इतर काही विभागांचा कार्यभार येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق