राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाची नोटीस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2023

राहुल गांधी यांना लोकसभा सचिवालयाची नोटीस


नवी दिल्ली - विशेषाधिकार भंग प्रकरणी लोकसभा (Loksabha) सचिवालयाने काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना नोटीस (Notice) पाठवली आहे. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी यांना १५ फेब्रुवारीपर्यंत उत्तर देण्यास सांगितले आहे. भाजप (Bjp)  खासदार निशिकांत दुबे आणि प्रल्हाद जोशी यांच्या तक्रारीवरून लोकसभा सचिवालयाने राहुल गांधी (Notice to Rahul Gandhi) यांना ही नोटीस पाठवली आहे.

७ फेब्रुवारी रोजी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात खोटे, अवमानकारक, असंसदीय आणि दिशाभूल करणारे तथ्य ठेवल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी लोकसभा सचिवालयाच्या विशेषाधिकार आणि आचार शाखेच्या उपसचिवांनी राहुल गांधींना ई-मेलद्वारे नोटीस पाठवली आहे.

निशिकांत दुबे यांनी राहुल गांधींविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस बजावली होती. तर संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून म्हटले होते की, नियम ३८० अन्वये राहुल गांधी यांनी केलेले असंसदीय आणि अनादर दर्शवणारी वक्तव्ये, आरोप सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्यात यावेत.

राहुल गांधींच्या त्या भाषणादरम्यान लोकसभेतील वातावरण चांगलेच तापले होते. त्यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला. यासोबतच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात विशेषाधिकार भंगाची नोटीस दिली होती. निशिकांत दुबे यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून ७ फेब्रुवारीला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कोणत्याही पुराव्याशिवाय संसदेत पंतप्रधानांवर आरोप केले होते. त्यांचे आरोप चुकीचे, दिशाभूल करणारे होते, असे म्हटले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad