मतदारांच्या बोटावरची शाई मिटण्यापूर्वीच सत्यजीत तांबे यांचा आभार दौरा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 February 2023

मतदारांच्या बोटावरची शाई मिटण्यापूर्वीच सत्यजीत तांबे यांचा आभार दौरा


नाशिक - नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे (Satyajit Tambe) यांच्या उमेदवारीवरून प्रचंड मोठ्या प्रमाणावर गोंधळ उडाला होता. अचानकपणे आपल्या पदरी पडलेल्या अपक्ष उमेदवारीमुळे संपूर्ण मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना पुरेसा वेळदेखील मिळाला नव्हता. तरीही, मतदारांनी तांबे परीवारा प्रती असलेले आपले प्रेम आणि विश्वास मतपेटीच्या माध्यमातून व्यक्त करत त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. याच मतदारांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी व त्यांचे आभार मानण्यासाठी आमदार सत्यजीत तांबे आभार दौऱ्याच्या माध्यमातून लोकांशी संवाद साधत आहेत.

०८ फेब्रुवारी रोजी विधानभवन येथे सत्यजीत तांबे यांनी आमदार पदाची शपथ घेतली. त्यानंतर लगेचच त्याच दिवशी मालेगाव व धुळे जिल्ह्यांतून त्यांनी आभार दौऱ्याची सुरुवात केली. त्यानंतर जळगाव, अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव, राहाता व राहुरी तालुक्यांचा देखील आभार दौरा त्यांनी केला. यावेळी आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या मतदारांसह तेथील सर्व लोकांना भेटून त्यांचे आभार मानले. अहिल्याबाई होळकरांच्या जन्मगाव असलेल्या चोंडीपासून ते गुजरात राज्याची सीमेवर असलेल्या आदिवासी बहुल धडगाव तालुक्यापर्यंत विस्तारलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघात एकूण ५४ तालुक्यांचा समावेश आहे. सर्वदूर पसरलेल्या या संपूर्ण मतदारसंघाचा दौरा करण्यासाठी किमान सहा महिने तरी लागतील. परंतु, अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी २७ फेब्रुवारी रोजी सुरु होणार आहे, त्यापूर्वी जास्तीत तालुक्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले आहे. नंतर टप्प्या- टप्प्याने या सर्व तालुक्यांचा दौरा करत शक्य तितक्या लोकांचे आभार मानणार असल्याची माहिती त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून दिली आहे.

सोमवार २७ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार सत्यजीत तांबे यांचा संसदीय कामकाजात पहिल्यांदाच प्रत्यक्ष सहभाग असणार आहे. लोकप्रतिनिधींचा मतदारांशी व जनतेशी असलेला संवाद ही लोकशाहीतील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आभार दौऱ्याचे निमित्त असले तरी या संवादातून आपल्या कारकिर्दीत आपल्याला काय काम करायचे आहे? तसेच लोकांच्या आपल्याकडून काय अपेक्षा आहेत? हे समजण्यास मदत होत असल्याचे देखील तांबे यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.

आमदार झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची भेट घेऊन विनाअनुदानित शिक्षकांना शाळा तपासणीची अट न ठेवता तातडीने अनुदान द्यावे व वेतनात महागाई निर्देशांकानुसार वाढ व्हावी यासाठी निवेदन पत्र दिले. तसेच, जुनी पेन्शन योजनेच्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चेसाठी भेटण्यास वेळ देण्याची विनंतीदेखील केली होती. तसेच, विधानभवन येथील शपथविधी सोहळा आटोपल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी थेट आझाद मैदान गाठले व तिथे विविध विषयांवर सुरू असलेल्या आंदोलनांना भेटी दिल्या व आंदोलनकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या सर्व मागण्या आणि प्रश्न मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व संबंधित खात्यांच्या मंत्री महोदयांपर्यंत मांडण्याचे आश्वासन त्यांनी संबंधित आंदोलनकर्त्यांना दिले आहेत.

वडील डॉ. सुधीर तांबे यांचा जनसेवेचा वारसा यशस्वीरित्या पुढे नेत असताना आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या लोकहितवादी कामांना जोरदार सुरुवात केली आहे. आमदार सत्यजीत तांबे यांच्या आभार दौऱ्याचे संपूर्ण मतदारसंघातील लोकांनी स्वागत केले असून त्यांच्यावर सर्वत्र कौतुकाचे वर्षाव होत आहे. आभार दौऱ्याच्या निमित्ताने तांबे कुटुंबियांची संपूर्ण मतदारसंघातील जनतेशी असलेली बांधिलकी व दांडगा संपर्क पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी लोकांच्या समस्या जाणून घेणार -
सोमवार (२७ फेब्रुवारी) पासून राज्य विधिमंडळाचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. त्यापूर्वी जास्तीत जास्त ठिकाणी आभार दौरा करत त्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणार व त्यांना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत विधिमंडळात प्रश्न उपस्थित करत चर्चा घडवून आणणार.
-  सत्यजीत तांबे, आमदार

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad