शिंदे फडणवीस सरकारचा ७ महिन्यात जाहिरातींवर ४२ कोटींचा खर्च - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिंदे फडणवीस सरकारचा ७ महिन्यात जाहिरातींवर ४२ कोटींचा खर्च

Share This

मुंबई - सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने 
जाहिरातबाजीवर तब्बल ४२ कोटी रुपये खर्च केले आहेत. फक्त ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून ही रक्कम खर्च करण्यात आली आहे. आरटीआय कार्यकर्ते नितीन यादव यांनी राज्य सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून मागवलेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. ( Government spends 42 crores on advertisements in 7 months )

जाहिरातींसाठी करण्यात आलेल्या ४२ कोटी ४४ लाख रुपये खर्चापैकी सर्वात जास्त खर्च हर घर तिरंगा या उपक्रमावर करण्यात आल्याचं दिसत आहे. हर घर तिरंगा उपक्रमासाठी १० कोटी ६१ लाख ५६८ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर केंद्राचा उपक्रम असलेल्या बूस्टर डोसच्या उपक्रमाच्या प्रसिद्धीसाठी ८६ लाख ७० हजार ३४४ रुपये खर्च करण्यात आले आहेत. तर राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा या उपक्रमाच्या जाहिरातीसाठी ४ कोटी ७२ लाख ५८ हजार १४८ रुपये खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.

जाहिरातींवर केलेल्या खर्चाची देयके नुकतीच राज्य शासनाकडून मला उपलब्ध झाली. यात धक्कादायक माहिती अशी की, या खर्चाची सरासरी काढली तर दिवसाला जवळपास १९ लाख ७४ हजार रुपये जनतेच्या खिशातील शासकीय पैशाची उधळपट्टी केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशातून शासनास जाणा-या या पैशांच्या खर्चावर शासन आतातरी अंकुश लावेल का? जाहिरातबाज सरकार फक्त जाहिरातबाजी न करता प्रसिद्धीचा हव्यास सोडून खरोखरच राज्याच्या विकासासाठी काम करेल का हा प्रश्न आहे असा प्रश्न नितीन यादव यांनी उपस्थित केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages