शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला, उध्दव ठाकरेंना धक्का - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला, उध्दव ठाकरेंना धक्का

Share This

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील संघर्षावर आज मोठा निर्णय दिला आहे. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. मात्र या निर्णया विरोधात उधव ठाकरेंची शिवसेना सुप्रीम कोर्टात न्याय मागणार आहे. (Shiv Sena name and bow to the Shinde group) 

एकनाथ शिंदेंनी ४० आमदारांसह बंडखोरी केली होती. त्यानंतर एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा केला होता यानंतर निवडणूक आयोगात सुनावणी सुरू होती. ही सुनावणी पूर्ण झाली असून बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने निर्णय दिलं आहे. या निर्णयाचे शिंदे गटाकडून फटाके वाजवून स्वागत केले. पुढच्या दोन ते तीन महिन्यांत राज्यात महापालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्या अगोदर शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे.

हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय : मुख्यमंत्री

लोकशाहीचा आणि भारतीय घटनेचा हा विजय आहे. हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages