भाजपा- शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला दिमाखात सुरुवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

भाजपा- शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला दिमाखात सुरुवात

Share This

मुंबई - जोरदार शक्तिप्रदर्शन करत भाजपा आणि शिवसेनेच्या आशीर्वाद यात्रेला घाटकोपर पश्चिम  अमृतनगरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जोरदार सुरूवात झाली. भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार, खा. मनोज कोटक यांच्या प्रमुख उपस्थितीत अयोध्येतून आणलेला धनुष्यबाण उंचावत यात्रेची सुरुवात झाली. यावेळी हजारोंच्या संख्येने भाजपा - शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. एकूण सहा लोकसभा मतदार संघातून ही यात्रा निघणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद यात्रेला सुरूवात झाली. यात्रेत जवळपास १० हजारांपेक्षा जास्त कार्यकर्ते बाईकवर स्वार होऊन भाजपा - शिवसेना झेंडा फडकवत सहभागी झाले. यात्रा मुलुंड बाळराजेश्वर मंदिरापर्यंत काढण्यात आली. 

यावेळी बोलताना भाजपा मुंबई अध्यक्ष आ. ॲड. आशिष शेलार म्हणाले, “भाजप आणि शिवसेना सोबत असून  धनुष्यबाण चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व आमच्याबरोबर आहे याचा आनंद आहेच, तसा आनंद जनतेलाही आहे. जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठीच ही यात्रा आहे.” असेही ते म्हणाले. यावेळी आ. राम कदम, आ. मिहीर कोटेचा, आ. पराग शाह यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ليست هناك تعليقات:

إرسال تعليق

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages