भाऊ दाजी लाड वास्तूसंग्रहालयाचा जीर्णोद्धार, पालिका करणार ३ कोटींचा खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 April 2023

भाऊ दाजी लाड वास्तूसंग्रहालयाचा जीर्णोद्धार, पालिका करणार ३ कोटींचा खर्च


मुंबई -  भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयातील डॉ. भाऊ दाजी लाड वास्तुसंग्रहालयाचा तब्बल २० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. रंगरंगोटी, इमारत परिसरातील शिल्पांना नवी झळाळी अशी विविध कामे करत करण्यात येणार आहेत. त्यामुळे देशविदेशातील पर्यटकांना भारताच्या इतिहासाचा अनुभव घेता येणार आहे. यासाठी मुंबई महापालिका ३ कोटी ५० लाख ४७ हजार ८०४ रुपये खर्च करणार आहे. वास्तुसंग्रहालयाचा जीर्णोद्धाराच्या कामासाठी प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे.

मुंबई शहरास तत्कालिन वास्तुशास्त्रीय, सांस्कृतीक समृद्धाचा तसेच काही ऐतिहासिक घटनांचे स्मरण देणाऱ्या अशा भव्य वास्तू , प्रतिमा यांचे देणे लाभले आहे. या वारसा वास्तुंचे काळजीपूर्वक संरक्षण, परिरक्षणाचे दृष्टीने महाराष्ट्र शासनाने विकास नियंत्रण नियमावलीत नियम ६७ सुधारीत करुन 'वारसा वास्तू जतन अधिनियमित केला आहे. डॉ. भाऊ दाजी लाड वास्तुसंग्रहालय ही पुरातन वास्तु सूचीमध्ये श्रेणी १ या दर्जात मोडते.  दगडी बांधकाम असलेल्या या वास्तुचा सर्वकष जीर्णोद्धार २००३-०४ मध्ये करण्यात आला होता. मागील २० वर्षांमध्ये सदर इमारतीची काही प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे इमारत पुन्हा मजबूत व टिकाऊ करण्यासाठी विविध कामे हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

डॉ. भाऊ दाजी लाड वास्तुसंग्रहालय वीरमाता जिजाबाई उद्यानात देशविदेशातील पर्यटक या वास्तुची ऐतिहासिक सुंदरता व संग्रहालयामधील भारताच्या इतिहासाचे व मुंबई शहराचे दर्शन घडविणाऱ्या अनेक वस्तु, शिल्प यांचा अनुभवासाठी येतात. इमारतीच्या जीर्णोद्वार कामासाठी इमारतीच्या संरचनात्मक स्थित समजून घेत सरंचनात्मक अहवाल तयार करण्याच्यादृष्टीने पुरातन सल्लागार मे. विकास दिलावरी यांची नेमणूक करण्यात आली आहे.

अशी होणार कामे -
-  मंगळूर कौलांची सर्वकष दुरुस्ती करणे
- आरसीसी स्लॅबची गळती प्रतिबंधक दुरुस्ती
- छप्पर व इतर ठिकाणी नक्षीदार रंगकामाचे जीर्णोद्धार
- इमारतीच्या बाह्य भागाची दुरुस्ती
- आतून, बाहेरुन चुन्याचा गिलावा व रंगकाम
-  इमारतीची वाळवी प्रतिरोधक कामे करणे
- इमारतीच्या बाहेरील अनेक शिल्प व्यवस्थित लावणे
- लोखंडी फरसबंदी करणे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad