Sarkari Yojana - मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 April 2023

Sarkari Yojana - मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना


मुंबई - राज्यात 'अटल' सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने 1 लाख पारेषण विरहीत सौर कृषीपंप 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात वाटप करण्यात येणार आहेत. पहिला टप्यात २५००० नग,दुसरा टप्यात ५०००० नग, तिसऱ्या टप्यात २५००० नग कृषी पंप वाटप केले जाणार आहेत. (Sarkari Yojana, Government Schemes)

सौरकृषीपंपाचे फायदे -
सौरकृषीपंपामुळे दिवसा शेतीपंपास वीज उपलब्ध होईल. दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा केला जाणार आहे. शेतकऱ्याना वीज बिलापासून मुक्तता मिळणार आहे. डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च होणार आहे. यामधून पर्यावरणाचे रक्षण केले जाणार असून औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमी केला जाणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्टे -
पारेषण विरहित 1 लाख सौरकृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. सौर कृषीपंपासोबत दोन डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश असणार आहे.

योजनेची ठळक वैशिष्टे
लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (३ व ५ अश्वशक्ती ) :
- शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.
- पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.
- ५ एकरापर्यंत शेतजमीन धारकास ३ अश्वशक्ती सौर कृषीपंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.
- यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.
- अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य. वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
- “धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
- महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरी अर्जदार.

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता:
- विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
- अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) ६० टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.
- खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.२ च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
- कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

अधिक माहिती खालील लिंक वर -  https://www.mahadiscom.in/solar/index_mr.html

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad