उघड्यावर शौच करताना प्रायव्हेट पार्टमध्ये घुसला साप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 April 2023

उघड्यावर शौच करताना प्रायव्हेट पार्टमध्ये घुसला साप


लखनऊ - उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एक अनोखी घटना समोर आली आहे. बनियानी पुरवा गावात उघड्यावर शौचास गेलेल्या तरुणासोबत असे काही घडले की ऐकणारेही थक्क झाले. मेडिकल कॉलेजमध्ये आपत्कालीन स्थितीत दाखल तरुणावर उपचार सुरू करण्यात आले असून चाचण्यांचा अहवाल आल्यानंतरच ते कळू शकेल. (Snake entered the private part of a young man who was defecating in the open)

हे प्रकरण कोतवाली देहातमधील बनियानी पुरवा गावाशी संबंधित आहे.  याच गावातील २५ वर्षीय तरुण सोमवारी सायंकाळी उशिरा शौचासाठी गावात गेला होता. असे सांगितले जाते की, हा तरुण शौच करत असताना त्याच्या प्रायव्हेट पार्टमधून साप त्याच्या पोटात शिरला, हा प्रकार होताच तो तरुण ओरडत आणि रडत घराकडे धावला, त्याचे शब्द घरच्यांनी ऐकले, तेव्हा ते तसेच स्तब्ध राहिले. 

घाईगडबडीत त्याला वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आधी सर्व तपासण्या केल्या जातील, सीटी स्कॅन केले जातील, त्यांचा रिपोर्ट आल्यानंतरच नक्की काय ते कळू शकेल.  तरुणासोबत अशा प्रकारचा अनुचित प्रकार घडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad