नवी दिल्ली - भारतीय रिझर्व्ह बँकेने बाजारातून २००० रुपयांच्या नोटा मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत नोटा वापरता येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे. २०१८-१९ मध्येच २००० रुपयांच्या नोटांची छपाई थांबवण्यात आली होती. नागरिकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी ४ महिन्यांचा कालावधी आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून २ हजार रुपयांच्या नोटा मागे घेण्याची घोषणा केली. मात्र, सध्या बाजारात असलेल्या २ हजार रुपयांच्या नोटा व्यवहारासाठी वापरता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली. या नोटा ३० सप्टेंबरपर्यंत वैध राहणार आहेत. तोपर्यंत ज्यांच्याकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत, त्यांनी बँकेकडून नोटा बदलून घ्याव्या लागणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्वच्छ नोट धोरणाच्या अनुषंगाने २००० मूल्याच्या नोटा चलनातून काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांना ३० सप्टेंबरपर्यंत नोटा बदलता येणार असल्याची माहिती आरबीआयने दिली. सर्व बँकांनी ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत २००० च्या नोटांसाठी ठेव आणि किंवा विनिमय सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे आरबीआयने म्हटले आहे.
निश्चलिकरण नोव्हेंबर २०१६ मध्ये पाहायला मिळाले होते. त्यावेळी २ हजारच्या नोटा चलनात आल्या होत्या. आता या नोटा चलनातून बाद होणार आहेत. आकडेवारीनुसार २०१६ मध्ये देशात २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २,२७२ होती. मार्च २०१७ पूर्वी जारी करण्यात आलेल्या २,००० रुपयांच्या नोटांपैकी ८९ टक्क्यांहून अधिक नोटांचे आयुष्य चार ते पाच वर्षे पूर्ण झाले आहे. ३१ मार्च २०१८ पर्यंत ६.७३ लाख कोटी रुपयांच्या २,००० रुपयांच्या नोटा चलनात होत्या. ३१ मे २०२३ पर्यंत ३.६२ लाख कोटी रुपयांच्या फक्त दोन हजार रुपयांच्या नोटा चलनात आहेत, जे एकूण नोटांच्या चलनाच्या केवळ १०.८ टक्के आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे. दरम्यान, संसदेत १ ऑगस्ट २०२२ रोजी दिलेल्या उत्तरात म्हटले होते की एनसीआरबी डेटानुसार २०१६ ते २०२० दरम्यान देशात जप्त करण्यात आलेल्या २००० रुपयांच्या बनावट नोटांची संख्या २,२७२ वरून २,४४,८३४ वर पोहोचली आहे.
एकावेळी २० हजारांच्या नोटा बदलता येणार
एकावेळी फक्त २ हजार रुपयांच्या नोटा २० हजार रुपयांपर्यंत बदलू शकता. यासाठी बँकांना विशेष खिडकी उघडावी लागणार आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीनंतर २००० हजार रुपयांची नोट चलनात आली. नोटाबंदीमध्ये ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्यात आल्या होत्या.
तीन वर्षात एकही नोट छापली नाही -
२०१६-१७ या आर्थिक वर्षात २००० रुपयांच्या ३५४२९.९१ कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर २०१७-१८ मध्ये अत्यंत कमी १११५.०७ कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन २०१८-१९ मध्ये केवळ ४६६.९० कोटी नोटा छापण्यात आल्या. २०१९-२०, २०२०-२१ आणि २०२१-२२ या तीन आर्थिक वर्षांत २००० रुपयांची एकही नोट छापलेली नाही. निर्णय अत्यंत बालिश केंद्र सरकारच्या २ हजारांची नोट बंद करण्याच्या निर्णयावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मागच्या नोटबंदीच्या निर्णयाप्रमाणे हा नोटबंदीचा निर्णयही बालिश आहे, असे म्हटले. मागच्या नोटबंदीची ३ मोठी उद्दिष्टे होती. पाकिस्तानचा दहशतवाद बंद होईल, भ्रष्टाचार बंद होईल, काळा पैसा नष्ट होईल. मात्र यातील एकही उद्दिष्ट साध्य झाले नाही, अशी टीका चव्हाण यांनी केली. नोटा बदलण्यासाठी नागरिकांना भर उन्हात पुन्हा रांगेत उभारण्याची वेळ येणार आहे.
No comments:
Post a Comment