Swadhar yojana - बौध्द विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 May 2023

Swadhar yojana - बौध्द विद्यार्थ्यांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना


औद्योगिक क्षेत्रांबरोबर शिक्षण शेत्रात सुद्धा मोठयाप्रमाणात विकास होत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या वाढत आहे, तसेच या महाविद्यालयांमध्ये व्यवसायिक किंवा बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा संख्या वाढत आहे, या विद्यार्थ्यांमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी असतात जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये मोडतात. (Sarkari Yojana, Government Schemes)

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे बहुतांश वेळा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षण घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात, या सर्व विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांसाठी हि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 सुरु केली आहे, जेणेकरून या विद्यार्थ्यांना त्यांचे उच्च शिक्षण अबाधित पूर्ण करता यावे. 

राज्यात वाढत असलेली व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक महाविद्यालयांची संख्या आणि या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. आणि त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळत नाही, या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना त्यामुळे त्यांचे उच्च शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो, त्यामुळे त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासात बाधा निर्माण होते. या बाबींचा विचार करून महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर व्यावसायिक किंवा बिगर व्यावसायिक शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास आणि इतर शैक्षणिक सुविधा या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेता याव्यात. यासाठी आवश्यक असलेली अनुदानाची रक्कम सबंधित अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) व्दारे वितरीत करण्यासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र सरकारच्या सन 2017 च्या निर्णयानुसार शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष विभागाच्या माध्यमातून या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना 2023 हि योजना महाराष्ट्र शासनाने 2016 ते 2017 मध्ये सुरु केली. हि योजना एक शैक्षणिक योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत इयत्ता 11वी आणि 12वी मध्ये शिकणारे तसेच इयत्ता अकरावी आणि बारावी नंतरच्या व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या, परंतु कोणत्याही शासकीय किंवा महाविद्यालयाच्या वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांना त्यांना शिक्षण घेण्यात सहायता करण्यासाठी महाराष्ट्र स्वाधार योजना अंतर्गत अनुदानाच्या रुपात आर्थिक मदत केल्या जाते.

महाराष्ट्र स्वाधार योजना या योजनेचा लाभ राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील कुटुंबातील विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहे.
स्वाधार योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील विद्यार्थ्यांना निवास, भोजन आणि इतर शैक्षणिक खर्च यासाठी महाराष्ट्र शासनाकडून प्रतीवर्षी 51,000/- रुपये अनुदान म्हणून आर्थिक सहायता केली जाईल.
स्वाधार योजने अंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी आणि इयत्ता 12वी मध्ये शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आणि त्याचप्रमाणे विद्यार्थी पदवी, डिप्लोमा तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी अर्ज करू शकतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना या योजनेसाठी विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी किंवा 12वी, पदवी / पदविका परीक्षेमध्ये 60 टक्के पेक्षा जास्त असणे अनिवार्य आहे, तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी हि मर्यादा 50 टक्के आहे. 

महाराष्ट्र स्वाधार योजना 2023 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना इयत्ता 11वी, 12वी पदवी, पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि ज्यांना शासकीय वसतीगृहामध्ये प्रवेश मिळाला नाही, अशा पात्र विद्यार्थ्यांना भोजन भत्ता व निवासाची सोय आणि इतर शैक्षणिक सुविधांसाठी वार्षिक खर्चासाठी खालीलप्रमाणे अनुदानाची रक्कम सबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करण्यात येते. 

लाभार्थी पात्रता निकष -
१ - या योजनेंतर्गत लाभ मिळवण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गाचा असणे आवश्यक आहे.
२ - विद्यार्थ्यांनी जातीचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल.
विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
३ - या योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी ज्या राष्ट्रीयकृत बँकेत किंवा शेड्यूल बँकेत खाते उघडले आहे, त्या खात्याशी स्वतःचा आधार क्रमांक संलग्न करणे बंधनकारक असेल.
विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वर्षी एकूण उत्पन्न 2.5 लाख रुपये पेक्षा जास्त नसावे.
४ - या योजने अंतर्गत विद्यार्थी स्थानिक नसावा, म्हणजे विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणचा सदर विद्यार्थी रहिवासी नसावा.
५ - स्वाधार योजनेंतर्गत विद्यार्थी इयत्ता 11वी किंवा 12वी आणि त्यानंतरचे दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसलेल्या अभ्यासक्रमांसाठी उच्च शिक्षण घेणारा असावा.
६ - स्वाधार योजनेमध्ये इयत्ता 11वी आणि 12वी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना इयत्ता 10वी मध्ये किमान 60 टक्के पेक्षा जास्त गुण असणे अनिवार्य आहे.
७ - या योजनेच्या अंतर्गत दोन वर्षापेक्षा कमी कालावधी नसणाऱ्या कोणत्याही मान्यताप्राप्त अभ्यासक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक वर्षी किमान 60 टक्के गुण किंवा त्या प्रमाणात ग्रेडेशन / CGPA चे गुण असणे आवश्यक आहे. 
८ - स्वाधार योजनेच्या अंतर्गत इयत्ता 12वी नंतर पदविका किंवा पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम हा दोन वर्षापेक्षा कमी नसावा त्याचप्रमाणे पदवीनंतर पदव्युत्तर पदवी किंवा पदविका अभ्यासक्रमाचा कालावधीही दोन वर्षापेक्षा कमी नसावा.
९ - स्वाधार योजनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी राज्य शासन, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, भारतीय वैद्यकीय शिक्षण परिषद, वैद्यकीय परिषद, भारतातील फार्मसी परिषद, वास्तुकला परिषद, कृषी परिषद, महाराष्ट्र तंत्र शिक्षण परिषद किंवा तत्सम सक्षम प्रधीकारी यांच्या मार्फत मान्यताप्राप्त महाविद्यालयांमध्ये आणि मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेला असावा.

लागणारी कागदपत्र -
अधिकृत जातीचे प्रमाणपत्र
महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र ( अधिवास प्रमाणपत्र / रेशनकार्ड / निवडणूक ओळखपत्र / जन्म तारखेचा दाखला / शाळा सोडल्याचा दाखला यापैकी कोणतेही)
आधार कार्डाची प्रत
बँकेत खाते उघडले याचा पुरावा म्हणून बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची प्रत
तहसीलदाराने दिलेला उत्पन्नाचा दाखला किंवा वडील नोकरीत असल्यास फॉर्म नंबर 16
विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्या बाबतचे प्रमाणपत्र 
इयत्ता 10वी, 12वी किंवा पदवी परीक्षेचे गुणपत्रिका
महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र
विद्यार्थिनी विवाहित असल्यास पतीच्या उत्पन्नाचा दाखला.
बँकखाते आधार क्रमांकाशी संलग्न केल्याबाबतचा पुरावा
विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र
स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
वर्तमान रहिवासी पत्ता पुरावा
महाविद्यालायचे उपस्थितीचे प्रमाणपत्र
सत्र परीक्षेच्या निकालाची प्रत 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS