Mega Block मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2023

Mega Block मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक


Mega Block मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक

मुंबई - रुळांची दुरुस्ती, ओव्हरहेड वायर दुरुस्ती, सिंगल यंत्रणेची दुरुस्ती अशा विविध कामांसाठी रविवार, ११ जून रोजी मध्य, हार्बर व पश्चिम रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. या मेगा ब्लॉकच्या कालावधीत काही लोकल उशीराने धावणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-विद्याविहार अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. या कालावधीत सीएसएमटी-विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावरील लोकल वळवण्यात येणार आहेत. तर भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे योग्य डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर स्थानकातून सुटणाऱ्या अप धीम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावरील पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत (बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग वगळून) दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. पनवेल स्थानकातून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल आणि सीएसएमटी स्थानकातून पनवेल, बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तर पनवेल स्थानकातून ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे स्थानकातून पनवेलसाठी जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील. तसेच ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन लोकल उपलब्ध असतील. तर बेलापूर-खारकोपर आणि नेरुळ-खारकोपर दरम्यान लोकल वेळापत्रकानुसार धावतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पश्चिम रेल्वे मार्गावर १४ तासांचा ब्लॉक -
पश्चिम रेल्वे मार्गावर जोगेश्वरी-गोरेगाव स्थानकादरम्यान शनिवार रात्री १२ ते रविवार ११ जून दुपारी २ वाजेपर्यंत दुरुस्ती काम हाती घेण्यात येणार आहे. या कालावधीत मेल एक्स्प्रेस रद्द करण्यात येणार आहेत. तर जोगेश्वरी - गोरेगाव दरम्यान १४ तासांचा ब्लॉक घेण्यात आला असून या कालावधीत अंधेरी - गोरेगाव दरम्यान लोकल अप व डाऊन जलद मार्गावर धावतील. चर्चगेट बोरिवली दरम्यान धावणाऱ्या लोकल वांद्रे स्थानकापर्यंत धावतील. तर सीएसएमटी - गोरेगाव स्थानकादरम्यान धावणाऱ्या लोकल वांद्रे स्थानकापर्यंत धावतील, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad