मुंबई - पालिका अधिकाऱ्यांसह इतर कर्मचार्यांशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चार आरोपीविरुद्ध मालाड पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. या चौघांनी ऍट्रोसिटीचा बोगस गुन्हा दाखल करून त्यांच्याविरुद्ध कारवाईची धमकी दिली होती. भरत पांचाळ, अशोक पांचाळ, चिनू पांचाळ आणि निखील पांचाळ अशी या चौघांची नावे आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजता मालाड येथील पेस्टेज इंडस्ट्रियल इस्टेट, रामजी कंपाऊंडमध्ये घडली. प्रविण मुळुक हे मालाडच्या पी-उत्तर विभागात सहाय्यक अभियंता म्हणून काम करतात.
दोन दिवसांपूर्वी ते त्यांच्या मनपा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत अनधिकृत बांधकामाची पाहणीसाठी गेले होते. तिथे गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना काहीजण अनधिकृत शेड बांधत असल्याचे दिसून आले. चौकशी करताना तिथे भरत, अशोक, चिनू आणि निखील पांचाळ आले आणि त्यांनी या अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ करण्यास करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती कलमांतर्गत गुन्हा करण्याची धमकी दिली होती. हा प्रकार समजताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.
No comments:
Post a Comment