Political News राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Political News राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड

Share This

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या २५ व्या वर्धापण दिनाच्या कार्यक्रमात याबाबतची घोषणा केली आहे.

शरद पवार यांच्या घोषणेमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे हे दोन्ही काम पाहाणार आहेत. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या दोघांकडे वेगवेगळ्या राज्यांची जबाबदारी सोपवली आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे मध्यप्रदेश गुजरात, राजस्थान आणि झारखंड हे राज्य सोपवण्यात आले आहेत.

राष्ट्रवादी कांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईतील चेंबूर येथील एका कार्यक्रमात आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. जर ती वेळीच फिरवली नाही तर करपू शकते, असं सुचक पण गोंधळात टाकणारं वक्तव्य केलं होतं. पवार यांनी केलेल्या या वत्तव्याचा रोख नेमका कशाकडे आहे, याबाबत तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती. त्यांच्या वक्तव्याने अनेकांना संभ्रमात टाकलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांच्या 'लोक माझे सांगाती' या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली होती.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages