मुंबईत हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 August 2023

मुंबईत हिवताप, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ


मुंबई (जेपीएन न्यूज) - ऑगस्ट सुरू झाल्यापासून पावसाचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम साथरोग रुग्णांवरही दिसून येऊ लागला आहे. मुंबईमध्ये जुलैच्या तुलनेत साथरोग रुग्णांमध्ये घट झाली असली तरी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याच्या तुलनेत दुसऱ्या आठवड्यात हिवताप, गॅस्ट्रो, डेंग्यूचे रुग्ण अधिक सापडत असल्याने या आजारांचा धोका अद्यापही कायम आहे. मात्र स्वाईन फ्लू, काविळ, चिकनगुनिया या रुग्णांच्या संख्येत घट झालेली दिसून येत आहे. तर लेप्टोच्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. (Winter fever, increase in dengue patients in Mumbai)

जुलैमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईमध्ये साथीच्या आजारांनी डोके वर काढले होते. मात्र ऑगस्ट सुरू होताच पावसाचे प्रमाण कमी झाल्याने साथीच्या रुग्णांच्या संख्येत काहीशी घट झाली. जुलैच्या तुलनेत रुग्णांच्या संख्येत घट झाली असली तरी अद्याप हिवताप, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ऑगस्टच्या १३ दिवसांमध्ये मुंबईमध्ये हिवतापाचे ४६२ रुग्ण सापडले. तर डेंग्यूचे ३१७, गॅस्ट्रोचे ४२९ रुग्ण सापडले आहेत. तर लेप्टोचे १५१ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये ऑगस्टच्या १ ते ६ ऑगस्ट या आठवड्याच्या तुलनेत ७ ते १३ ऑगस्ट या दुसऱ्या आठवड्यामध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्याचवेळी स्वाईन फ्लू, काविळ आणि चिकनगुनिया या रोगांचे अनुक्रमे ३४, ९ आणि २ रुग्ण दुसऱ्या आठवड्यामध्ये सापडले आहेत. 

लेप्टोच्या रुग्णांची संख्या घटली -
पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणी तुंबण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. यामुळे जुलैमध्ये लेप्टोच्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली होती. जुलैमध्ये लेप्टोचे ४१३ रुग्ण सापडले होते. मात्र ऑगस्टच्या १३ दिवसांमध्ये हीच संख्या १५१ वर आली आहे. त्यामुळे लेप्टोचा धोका कमी होत असल्याचे दिसून येत आहे. 

अशी घ्या काळजी -
पाऊस थांबला असल्याने सोसायटीच्या आवारामध्ये टायर, करवंट्या, भंगार यामध्ये पाणी साचलेले असते. या पाण्यामध्ये डेंग्यू व हिवतापाचे डास अंडी घालतात. त्यामुळे ऑगस्टमध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हिवताप व डेंग्यूला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेने दिलेल्या सूचनांचे पालन करण्याबरोबरच आपल्या परिसरामध्ये साचलेले पाणी आतून टाका. तसेच स्वाईन फ्लूचा त्रास हे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिक होतो. त्यामुळे त्याचे लसीकरण करून घेतल्यास परिणामकता कमी होते. 
- डॉ. भरत जगियासी, सचिव. इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, मुंबई शाखा

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad