मिठी नदी रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे हटवली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मिठी नदी रुंदीकरणात अडथळा ठरणारी बांधकामे हटवली

Share This

मुंबई - मिठी नदी रूंदीकरण प्रकल्पाच्या कामासाठी अडथळा ठरणाऱ्या ५६ बांधकामांवर निष्कासन कार्यवाही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आली. एल विभागाच्या कुर्ला पश्चिम येथे किस्मत नगर परिसरात वाणिज्य बांधकामांवर ही निष्कासन कार्यवाही आज (दिनांक ३० नोव्हेंबर २०२३) करण्यात आली. गेल्या दहा वर्षांमध्ये नदी रूंदीकरण प्रकल्पाच्या निमित्ताने झालेली ही पहिली कार्यवाही आहे.  

कुर्ला विभागातील मिठी नदीच्या पात्रात गेल्या अनेक वर्षांपासूनच्या बांधकाम अडथळा ठरत होती. त्यानुसार उप आयुक्त (परिमंडळ ५) हर्षद काळे आणि सहायक आयुक्त धनाजी हेर्लेकर यांच्या सुचनांनुसार ही कारवाई करण्यात आली. कलिना पूल ते सीएसटी पूल दरम्यान एकूण ९०० मीटर क्षेत्रात नदी पात्रात तसेच नदीच्या काठावर अशी एकूण ७५० बांधकामे ही नदी रूंदीकरण प्रकल्पाला अडथळा ठरत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत ५६ बांधकामे निष्कासन करण्याची पहिली कार्यवाही ही आज (दिनांक ३० नोव्हेंबर २०२३) करण्यात आली. नदी पात्रात अडथळा ठरणारी ही बांधकामे या कार्यवाहीत हटविण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नोटीशीविरोधात काही गोदाम मालकांनी न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या दहा वर्षांपासून ही कारवाई प्रलंबित होती. आज पहिली निष्कासन कार्यवाही आजपासून सुरू झाली. आज झालेल्या कार्यवाहीत एकूण एक एकर क्षेत्रफळाचा भूखंड निष्कासन कारवाईद्वारे मुक्त करण्यात आला. 

या कार्यवाहीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १५ अभियंता आणि १०० कामगारांची मदत घेण्यात आली. तर पोलीस प्रशासनाच्या ५० जणांनी कारवाईसाठी मदत केली. या कार्यवाहीनंतर नदी रूंदीकरण प्रकल्पासोबतच सेवा रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असे हेर्लेकर यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages