Mahaparinirvan Din - पुढच्या वर्षी बाबासाहेबांना इंदु मिल स्मारकावर अभिवादन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 December 2023

Mahaparinirvan Din - पुढच्या वर्षी बाबासाहेबांना इंदु मिल स्मारकावर अभिवादन


मुंबई - पुढील महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर अभिवादन करू. पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. जगाला हेवा वाटेल असे स्मारक उभारले जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमाच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी बोलताना ''लाखो अनुयायी चैत्यभुमी येथे आले आहेत. शासन आपल्या सर्वांचं आहे. सत्तेचा वापर परिवर्तनासाठी करण्याचं आणि समृद्धीचे दिवस आणण्यासाठी काम सुरू आहे. या सरकारसाठी सर्वोच्च महत्वाची बाब म्हणजे इंदु मिल स्मारक लवकर पूर्ण करणे आहे.'' जगाला हेवा वाटेल असं हे स्मारक असेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

''डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये केलेलं काम आहे. भारताच्या निर्मितीचे पहिलं पाऊल ठरलं आहे आणि म्हणूनच आपण त्यांना महामानव म्हणतो, कारण जिथे लोकांचे विचार संपतात तिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सुरू व्हायचे आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मुलाचा वाटा आहे. मला या गोष्टीचा समाधान आहे, ज्या वर्षी इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक व्हावं अशा प्रकारची मागणी झाली होती, त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंतप्रधान मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली. आज त्या ठिकाणी भव्य स्मारकाचा निर्माण होत आहे आणि मला अपेक्षा आहे की, आपला पुढच्या महापरिनिर्वाण दिनाला ज्यावेळेस आपण या ठिकाणी येऊ त्यावेळेस त्या स्मारकाला देखील आपल्याला अभिवादन करता आलं पाहिजे.'' त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात अतिशय वेगाने काम करण्याचा प्रयत्न आम्ही करू, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, खासदार राहुल शेवाळे, आमदार आशिष शेलार, प्रवीण दरेकर, कालिदास कोळंबकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर, माजी खासदार नरेंद्र जाधव, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, भिक्खू महासंघाचे अध्यक्ष डॉ. भदन्त राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे उपाध्यक्ष महेंद्र साळवे, सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad