मी हुडी घालून, गॉगल लावून फिरत नाही - उद्धव ठाकरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 December 2023

मी हुडी घालून, गॉगल लावून फिरत नाही - उद्धव ठाकरे


नवी दिल्ली - इंडिया आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. माझ्यासमोर कोणतीही स्वप्नं नाहीत. जनता ठरवेल ते आम्ही करणार आहोत. कधीतरी चेहरा ठरवावा लागेल, कोणीतरी निमंत्रक, समन्वयक ठरवावा लागेल. आजच्या बैठकीत आम्ही समन्वयक ठरवणार, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नाक पुसताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोमणा मारला. मी कोणाची स्टाईल मारत नाही. सर्दी झाली आहे, उगीच हुडी, गॉगल घालून फिरत नाही, असे ठाकरे म्हणाले. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे. यापूर्वी मुंबईत झालेल्या बैठकीला अनेक प्रादेशिक पक्ष होते. तीन राज्यांच्या निवडणुकांच्या पराभवाबाबत चर्चा होणार आहे. पुढलं वर्ष निवडणुकांचं आहे. इंडिया आघाडी मजबूत करू मग नवीन पक्षांना सोबत घेण्याची तयारी करू. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर चेहरा हा प्रश्न असला तरी आमच्या आघाडीला एका समन्वयकाचा विचार करावा लागेल.

जनता जे ठरवेल ते आम्ही करू -
इंडिया आघाडीच्या ‘सामना’च्या अग्रलेखावर उद्धव ठाकरे म्हणाले, ‘सामना’च्या अग्रलेखाचा अर्थ असा आहे की, घोडामैदान जवळच आहे. सगळं सैन्य जमलं आहे मात्र एकत्रितपणे पुढे जाण्यासाठी एक समन्वयक हवा आहे. प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याची वेळ आली आहे. सगळे जण आपापल्या राज्यात व्यस्त असतात, आम्ही सगळ्यांशी बोलू आणि मग ठरवू की समन्वयक कोण माझ्यासमोर कोणतीही स्वप्नं नाहीत, जनता जे ठरवेल ते आम्ही करू, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

माझे मत मी बैठकीत सांगेल -
महविकास आघाडीचा चेहरा शरद पवार योग्य वाटतात, यावर उद्धव ठाकरे म्हणतात की, माझं मत मी बैठकीत सांगेल. आता सांगून गैरसमज करू इच्छित नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad