Mega block - 24 डिसेंबरला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mega block - 24 डिसेंबरला मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Share This

मुंबई - अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामाकरीता तसेच पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी २४ डिसेंबर रोजी मध्य रेल्वेच्या (Central Railway) माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत तर हार्बर मार्गावर (Harbour Railway) पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. या मेगा ब्लॉकची नोंद घेवून प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक - 
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील. ठाण्यापुढील जलद गाड्या मुलुंड येथून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या नियोजित थांब्यांनुसार वळवण्यात येतील, माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिराने पोहोचतील.
डाउन जदल मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.२० वाजता सुटणारी बदलापूर लोकल असेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बदलापूर करिता दुपारी ३.३९ वाजता सुटेल.

अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी ११.१० वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ०४.४४ वाजता पोहोचेल.

हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक -
सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल येथून सुटणारी ठाणे येथे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेल येथून ठाण्याकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत बंद राहतील.

डाउन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.३० वाजता सुटेल आणि १०.५० वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी ३.१६ वाजता असेल आणि पनवेल येथे ४.३६ वाजता पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी शेवटची लोकल सकाळी १०.१७ वाजता पनवेल येथून सुटेल आणि ११.३६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पनवेल येथून पहिली लोकल दुपारी ४.१० वाजता असेल आणि ५.३० वाजता पनवेल येथे पोहोचेल. 

डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी ९.३९ वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी १०.३१ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ठाणे येथून दुपारी ४.०० वाजता असेल आणि पनवेल येथे ०४.५२ वाजता पोहोचेल. 

अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी १०.४१ वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी ११.३३ वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून ४.२६ वाजता सुटेल आणि ठाणे येथे संध्याकाळी ५.२० वाजता पोहचेल.
 
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी मार्गावर विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि खारकोपर स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages