Mumbai News - शौचालयाच्या टाकीत पडून तीन जणांचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Mumbai News - शौचालयाच्या टाकीत पडून तीन जणांचा मृत्यू

Share This

मुंबई - मुंबईत उघड्या गटारात पडून, पावसाळ्यात गटारात पडून वाहून जाणे, शौचालयाची टाकी साफ करताना मृत्यू होण्याच्या घटना नेहमीच घडत असतात. मुंबईच्या पश्चिम उपनगरात मालाड मालवणी येथे सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पडून तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Three people died after falling into the toilet tank)

शौचालयाच्या टाकीत पडले -
मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 21 मार्च रोजी सायंकाळी 5.30 च्या सुमारास मालाड मालवणी गेट नंबर 8 समोर, शिफा हार्डवेअरचे दुकान आहे. या दुकानासमोर सार्वजनिक शौचालय आहे. या शौचालयाच्या टाकीत 3 जण पडले. 15 फूट खोल असलेल्या टाकीतून या तिघांना स्थानिक नागरिकांनी बाहेर काढून जवळच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल केले. 

3 जणांचा मृत्यू - 
त्यापैकी सूरज केवत वय 18 वर्षे याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्णालयात दाखल केले त्याच दिवशी विकास केवत वय 20 वर्षे याचा त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर रामलागण केवत वय 45 वर्षे याच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज 24 मार्च रोजी सकाळी 7.30 दरम्यान त्याचाही मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages