Lok Sabha Election - निवडणूक आयोगाने पालिका आयुक्त चहल यांना पदावरून हटवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 March 2024

Lok Sabha Election - निवडणूक आयोगाने पालिका आयुक्त चहल यांना पदावरून हटवले


मुंबई - भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) आज बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या केल्या आहेत. तीन वर्षापेक्षा अधिक काळ एकाच ठिकाणी काम केल्याने या बदल्या करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह गुजरात, बिहार, यूपी, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यातील गृहसचिव आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. (Mumbai latest News)

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज नवे निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि आयुक्त ज्ञानेश कुमार यांची बैठक झाली. यानंतर महाराष्ट्रासह ६ राज्याच्या गृहसचिव, आयुक्त आणि अन्य प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश देण्यात आले. यापूर्वी आयोगाने महाराष्ट्र सरकारला आयुक्त आणि उपायुक्त यांच्या कार्यकाळ पूर्ण झाला असून त्यांच्या बदल्या करण्यात याव्या, याबाबत पत्र पाठविले होते.

चहल हे १९९८ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएस अधिकारी आहेत. चहल यांनी २०२० मध्ये कोविड काळात मुंबईच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला होता. यानंतर चहल यांच्या कार्यकाळ संपल्यानंतरही तो वाढवण्यात आला होता. परंतु, आता आयोगाच्या आदेशानंतर चहल यांची बदली करण्यात आली आहे. इक्बाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या कोस्टल रोड प्रकल्पात, रुग्णालयाचे अपग्रेडेशन आणि आधुनिकीकरण, नवीन रस्त्यांचे बांधकाम, मुंबईचे सुशोभीकरण आणि स्वच्छता मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी चार वर्षे ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि चार वर्षे औरंगाबादचे जिल्हाधिकारी, तसेच राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad