ताक प्या... शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 April 2024

ताक प्या... शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवा


मुंबई - ताक (buttermilk) हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती (boost the immune system) वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीरातील चरबी निघून जाते, इतकेच नव्हे तर चेहर्‍यावरील काळे डाग जावून चेहरा तरतरीत व तेजस्वी होतो.

ताकात विटामिन इ १२, कैल्शियम, पोटेशियम आणि फास्फोरस सारखे तत्व असतात जे शरीरासाठी फारच फायद्याचे असतात. ज्याचे पोट साफ होत नाही आणि पोटातून आवाज येतात त्यांनी ताक पिल्याने असे आजार नाहीसे होतात. ताक प्यायल्यानंतर शरीराची झीज ९० टक्के भरून निघून शरीरातील उष्णता त्वरित कमी होऊन अतिशय शांत झोप लागते. साधारण माणसाने सुध्दा दररोज ताक पायल्याने शरीरातील उष्णता लगेच कमी होते आणि ताकत प्रचंड प्रमाणात वाढते.

ताक पिण्याचे हे १० प्रकारचे फायदे -
ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. वारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो. दह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते. ताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात. ताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते. थोडी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते. रिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते. ताकात साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो. लहान मुलांना दात येतेवेळी त्यांना दररोज ४ चमचे असे दिवसभरातून २-३ वेळा दिल्यास दात येताना मुलांना होणारा त्रास कमी होतो. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ज्यांनी ह्या पूर्वी पैसे देवून पंचकर्म केलेलं आहे त्यांनी हा प्रयोग करून पहा, तेव्हा लक्षात येईलच. तुमची तब्येत ठीक तर होईलच पण पैसाही वाचेल. असे सहा महिन्यात एक वेळ करा, आपणास होणारे भावी मोठे आजार पण टळतील. त्यामुळे होणारा त्रास व औषधी खर्चही वाचेल.

कसे बनवले जाते ताक -
दही – पाणी – मीठ एकत्र करून घुसळून ताक बनवले जाते. जर तुम्हाला चटपटीत आणी पचनाला सोपे असे मसाला ताक बनवायचे असेल तर घराच्या घरी काही सोप्या साहित्यापासून तुम्ही झटपट मसाला ताक बनवू शकतात.

साहित्य –
४ कप दही
५ कप पाणी
२-३ हिरव्या मिरच्या
१ इंच आल्याचे तुकडे
१ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
४-५ पुदिना पाने
१ टेबलस्पून भाजलेली जिऱ्याची पावडर
सेंधवा मीठ

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad