मुंबई-उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 April 2024

मुंबई-उत्तर मध्यमधून भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी



मुंबई - मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून (Mumbai North Central) भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याचा सस्पेंस आता संपला आहे. या मतदारसंघातून भाजपने ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम (Ujjwal Nikam) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याच जागेवरुन महाविकास आघाडीमधील काँग्रेसने वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात निकम विरुद्ध गायकवाड यांच्यामध्ये लढत होणार आहे. निकम यांना उमेदवारी मिळाल्याने पुनम महाजन (Poonam Mahajan) यांचा पत्ता कट झाला आहे. (Marathi Latest News)

विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहणाऱ्या उज्ज्व निकम यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. कायदेपंडित अशी ओळख असलेल्या उज्ज्वल निकम यांनी देशातील अनेक महत्त्वाच्या खटल्यात काम केले आहे. ज्यात १९९३ साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यासह मुंबईवर झालेला २६/११ दहशतवादी हल्ला, खैरलांजी, सोनई येथील दलित अत्याचाराच्या खटल्यांमध्ये निकम यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली होती.

महाविकास आघाडीकडून दोनच दिवसांपूर्वी काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे भाजप वर्षा गायकवाड यांच्याविरोधात कोणाला उमेदवारी देते याची उत्सुकता होती. विद्यमान खासदार पूनम महाजन यांना पुन्हा संधी दिली जाते की नव्या चेहऱ्याला संधी दिली जाते याबाबत चर्चा सुरू असताना आशिष शेलार यांचे नाव देखील समोर आले होते. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी पूर्ण ताकद लावणार असल्याचे म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad