इगतपुरी धरणात ५ तरुण-तरुणींचा बुडून मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 May 2024

इगतपुरी धरणात ५ तरुण-तरुणींचा बुडून मृत्यू


नाशिक - इगतपुरी येथील भावली धरणात बुडून ५ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृतांमध्ये दोन तरुण व तीन तरुणींचा समावेश आहे. हे सर्वजण रिक्षा घेऊन धरणावर फिरण्यासाठी आले होते, त्यावेळी, रिक्षा धरणाजवळ उभी करुन ते पाण्यात पोहोण्यासाठी गेले असता ही भीषण दुर्घटना घडली. याबाबत माहिती मिळताच स्थानिक पोलिस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तत्पूर्वी स्थानिक आदिवासींनी धरणाकडे धाव घेतली होती. (5 youth drowned in Igatpuri dam)

धावली धरणात बुडालेले सर्वजण नाशिक रोड परिसरातील रहिवाशी आहेत. रिक्षा बाजुला लावून पोहोण्यासाठी धरणात उतरले असता सर्वजण बुडाले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने कडक उन्हापासून थोडासा दिलासा मिळावा म्हणून ते धरण परिसरात फिरण्यासाठी गेले होते. त्यावेळी, धरणात उतरल्यामुळे एकापाठोपाठ एक सर्वच पाचही जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. याबाबत माहिती मिळताच सर्वप्रथम स्थानिक आदिवासी नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. आदिवासी बांधवांच्या मदतीने सर्वांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad