मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 May 2024

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस


मुंबई - मुंबई उपनगर जिल्ह्यात 20 मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यादृष्टीने ‘एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये’ या संकल्पानुसार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी मतदानासाठी विशेष वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघानिहाय ठरविलेल्या एका निश्चित मार्गावर बेस्टमार्फत व्हिलचेअर प्रवेश योग्य मोफत बस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा दिव्यांग समन्वयक अधिकारी प्रसाद खैरनार यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्वसामान्य मतदारांसोबत दिव्यांग मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. जिल्ह्यात दिव्यांग पुरूष मतदार 9364 तर महिला दिव्यांग मतदार 6750, दिव्यांग तृतीयपंथी मतदार 2 असे एकूण 16 हजार 116 चिन्हांकीत दिव्यांग मतदार आहे. मतदान केंद्रावर जावून मतदान करता यावे यासाठी 1106 व्हिलचेअर मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या मतदारांना 613 ठिकाणाहून वाहतूक व्यवस्था पुरविण्यात येणार आहे. यासाठी एकूण 1106 स्वयंसेवकांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे.

दिव्यांग मतदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या स्वयंम ॲपबद्दल जिल्ह्यातील एकूण 13 हजार 888 दिव्यांग मतदारांना माहिती देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांना कोणतीही अडचण येवू नये तसेच मतदानाची प्रक्रिया समजावून सांगणे आणि जनजागृती करणे यासाठी 25 सामाजिक तसेच अपंग संस्थांच्या समन्वयाने 85 मेळावे देखील घेण्यात आले आहेत. तसेच 1321 मतदारांना ब्रेल वोटर स्लीपचे वाटप करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी 25 रिंगरूट व शटल रूटवर दिव्यांग सुलभ बसेस चालविण्यात येणार असून 613 ठिकाणी रिक्षा इको व्हॅनची व्यवस्था करण्यात आली असल्याचे खैरनार यांनी कळविले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad