तरुणांमध्ये ४० टक्क्यांनी उच्च रक्तदाब वाढला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

16 May 2024

तरुणांमध्ये ४० टक्क्यांनी उच्च रक्तदाब वाढला


नागपूर - बदलत्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आरोग्यावर होत आहेत. ताणतणाव युक्त जीवनशैलीमुळे हल्ली कमी वयातच उच्चरक्तदाबाचे रुग्ण दिसून येत आहेत. तरुणांमध्ये या विकाराची ४० टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. उच्चरक्तदाबाच्या एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्णांना मधूमेह असतो. त्यामुळे उच्चरक्तदाबाचे वेळेतच निदान व त्यावर उपचार केले पाहिजेत, असे मत हृदयरोगतज्ञ डॉ. अमेय बीडकर यांनी व्यक्त केले.

१७ मे हा दिवस जगभरात उच्चरक्तदाब दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने ते बोलत होते. डॉ. बीडकर म्हणाले, उच्च रक्तदाबाची लक्षणे लवकर दिसत नाहीत. अशास्थितीत एखाद्या रुग्णाच्या अवयवांपर्यंत जास्त दाबाने रक्त प्रवाहित होत असल्यास अवयवांना हानी पोहचण्याची शक्यता असते.

उच्चरक्तदाब म्हणजे हायपर टेन्शन. प्रौढ व्यक्तीमध्ये सामान्य रक्तदाब १२०/८० असतो. या संख्येत किंचीत चढ-उतार होऊ शकतात. परंतु जर रक्तदाब हा वारंवार १४०/९० पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ उच्च रक्तदाबाची शक्यता अधिक असते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad