मुंबई मराठी पत्रकार संघात 'परिवर्तन' - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 June 2024

मुंबई मराठी पत्रकार संघात 'परिवर्तन'मुंबई - मुंबईमधील पत्रकारांच्या हक्काची संघटना म्हणून ओळख असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाची द्विवार्षिक निवडणूक (Mumbai Marathi patrakar sangh election) शनिवारी संपन्न झाली. या निवडणुकीत संदीप चव्हाण (Sandip Chavan) यांच्या परिवर्तन पॅनलने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी संदीप चव्हाण यांचे परिवर्तन तसेच सुकृत खांडेकर (Sukrut Khandekar) यांचे समर्थ हे दोन पॅनल होते. या निवडणुकीत पत्रकार संघाच्या ४८७ सदस्यांनी भाग घेतला. अध्यक्षपदासाठी संदीप चव्हाण यांना ३१६ तर सुकृत खांडेकर यांना १६० मते मिळाल्याने संदीप चव्हाण यांची अध्यक्षपदावर निवड झाली. उपाध्यक्ष पदासाठी स्वाती घोसाळकर यांना २८८, राजेंद्र हुंजे यांना २२५ मते मिळाली तर उदय तानपाठक यांना २०८, विष्णू सोनवणे यांना २०३ मते मिळाली. सर्वाधिक मते मिळवल्याने उपाध्यक्षपदावर स्वाती घोसाळकर यांची निवड झाली. कार्यवाहपदी शैलेंद्र शिर्के यांची निवड झाली. तर कोषाध्यक्षपदी जगदीश भोवड यांचा २१० मतांनी विजय झाला. त्यांना ३३६ तर सारंग दर्शने यांना १२६ मते मिळाली. कार्यकारणी सदस्य पदासाठी देवेंद्र भोगले (२८२), दिवाकर शेजवलकर (२८२), गजानन सावंत (२७४), आत्माराम नाटेकर (२७३), विनोद साळवी (२७२), किरीट गोरे (२४७), अंशुमान पोयरेकर (२४६), राजेश खाडे (२४५), राजीव कुलकर्णी (२३४) यांना सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांची निवड झाली आहे.

कार्यकारणी सदस्य पदासाठी मिळालेली मते -
परिवर्तन पॅनल

देवेंद्र भोगले (२८२), दिवाकर शेजवलकर (२८२), गजानन सावंत (२७४), आत्माराम नाटेकर (२७३), विनोद साळवी (२७२), किरीट गोरे (२४७), अंशुमान पोयरेकर (२४६), राजेश खाडे (२४५), राजीव कुलकर्णी (२३४)

समर्थ पॅनल
कल्पना राणे (१८५), श्यामसुंदर सोन्नर (१७४), उमा कदम (१७२), रवींद्र भोजने (१६२), नंदकुमार पाटील (१६१), अरविंद सुर्वे (१४६), संतोष गायकवाड (१४२), विठ्ठल बेलवाडकर (११६), राजेंद्र साळस्कर (१०४), महेंद्र जगताप (९४), केतन खेडेकर (९२)

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad