लहान मुलांच्या अन्न सुरक्षेबाबत भारताचा जगातील खराब २० देशांमध्ये समावेश - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 June 2024

लहान मुलांच्या अन्न सुरक्षेबाबत भारताचा जगातील खराब २० देशांमध्ये समावेशनवी दिल्ली- लहान मुलांच्या अन्न गरिबीबाबत यूनिसेफचा एक रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये भारताची स्थिती अत्यंत खराब असल्याचे सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे भारत लहान मुलांच्या अन्न सुरक्षेबाबत पाकिस्तानपेक्षा वाईट स्थितीमध्ये आहे. भारताचा जगातील खराब २० देशांमध्ये समावेश होतो. भारतातील लहान मुलांना योग्य आणि आवश्यक आहार मिळत नाही असे रिपोर्ट सांगतो. (Child Nutrition Report)

दक्षिण आशियाई देशांमध्ये सर्वांत वाईट स्थिती अफगाणिस्तानची आहे. जगातील प्रत्येक चौथे लहान मूल हे भूकबळीचा सामना करत आहे. १८१ मिलियन मुलांपैकी ६५ टक्के लहान मुलं यांना योग्य आणि पुरेसे अन्न मिळत नसल्याचा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

चारपैकी एक मुलगा गंभीर श्रेणीमध्ये येतो. अशा मुलांना पुरेसे अन्न मिळत नाही किंवा खराब अन्न खाऊन जीवन जगावं लागतं. चाईल्ड न्यूट्रिशन रिपोर्ट २०२४ मध्ये हा दावा करण्यात आला आहे. रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, या अभ्यासासाठी ९१ देशांचा समावेश करण्यात आला होता. या अभ्यासात पाच वर्षे वयापर्यंतच्या मुलांचा समावेश करण्यात आला होता.

अभ्यासामध्ये गरीब आणि त्याच्यापेक्षा वरच्या श्रेणीमध्ये जगणा-या लोकांचा समावेश करण्यात आला होता. लहान मुलांना पौष्टिक आणि विविध प्रकारचा आहार मिळत आहे का नाही? याची माहिती घेतली गेली. मुलांना मिळणारे वाईट अन्न, खराब वातावरण, कुटुंबाचे उत्पन्न या गोष्टींचा अभ्यासामध्ये समावेश करण्यात आला होता.

स्थिती दयनीय!
भारताचा बाल गरिबीचा आकडा ४० टक्के आहे. त्यामुळे हे गंभीर श्रेणीमध्ये येते. पाकिस्तानची आपल्यापेक्षा थोडीशी बरी स्थिती आहे. पाकिस्तानचा बाल गरिबीचा आकडा ३८ टक्के आहे. अफगाणिस्तानमध्ये ४९ टक्के बाल गरिबी आहे. भारतापेक्षा सोमालिया, गिनी-बिसाऊ, सिएरा लियोन, इथिओपिया, लायबेरिया यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. रिपोर्टनुसार, भारताच्या सर्वांत वाईट देशांच्या यादीमध्ये पहिल्या २० मध्ये समावेश होतो. भारतातील लहान मुलांना पोषक आणि आवश्यक अन्न मिळत नाही, असे रिपोर्ट सांगतो.

जगातील ५ वर्षांखालील ३ पैकी २ लहान मुले भूकबळीचे शिकार आहेत. युनिसेफचा रिपोर्ट भारतासाठी धक्कादायक आहे. रिपोर्टमध्ये अफगाणिस्ताननंतर आशियामध्ये भारताची सर्वांत वाईट स्थिती असल्याचे सांगण्यात आले आहे. भारतातील ४० टक्के लहान मुलं गंभीर बाल अन्न गरिबीच्या श्रेणीत, तर ३६ टक्के मुलं मध्यम बाल अन्न गरिबीच्या श्रेणीमध्ये आहेत. ही स्थिती वाईट आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad