भारतातून कोट्यधीश मंडळींचे परदेशात स्थलांतराचे प्रमाण वाढले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 June 2024

भारतातून कोट्यधीश मंडळींचे परदेशात स्थलांतराचे प्रमाण वाढलेनवी दिल्ली - भारतातून कोट्यधीश मंडळींचे परदेशात स्थलांतर होण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मंडळी चांगल्या संधीची वाट पाहात असतात. आपल्या देशात शिक्षणाची चांगली संधी नाही, स्वत:ची चांगली प्रगती करण्याची संधी नाही की डॉलरमध्ये मिळणा-या पगाराचे आकर्षण. याबाबी उच्च मध्यमवर्गीयांना परदेशात नागरिकत्व घेण्यास खुणावत आल्या आहेत. परंतू जे भारतातच कोट्यधीश झाले आहेत असे चांगले सधन लोकही आता भारत सोडून चालले आहेत.

असे नेहमी म्हटले जाते की, जगातील दर सात स्थलांतरीतांपैकी एक जण हा भारतीय असतो. किंवा प्रत्येक मोठ्या देशात एक भारत वसलेला असतो. परंत हेनेली एण्ड पार्टनर्सच्या या संस्थेच्या २०२३ च्या आर्थिक वर्षांच्या मायग्रेशन अहवालाप्रमाणे भारतातून ५,१०० कोट्यधिशांनी आपला गाशा गुंडाळला आहे. तर यंदा ४,३०० कोट्यधिश देश सोडतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

भारतातून परदेशात सातत्याने ब्रेन ड्रेन होत आले आहे. जगातील प्रत्येक मोठ्या आयटी कंपनीच्या सीईओपदी आता भारतीय वंशांच्या व्यक्तींचा दबदबा बनला आहे. हेनले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट २०२४ संस्थेचा अहवाल जाहीर झाला आहे. भारतातून साल २०२३ मधून ५,१०० कोट्यधीश परदेशात स्थायिक झाले तर साल २०२४ मध्ये आणखी ४,३०० कोट्यधीश मंडळी परदेशात जातील असा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. केवळ भारतातूनच नाही तर ज्या देशाने आपल्या देशावर एकेकाळी दीडशे वर्षे राज्य केले त्या ग्रेट ब्रिटनमधून देखील साल २०२३ मध्ये ४,२०० कोट्यधीशांनी देश सोडला होता. आता साल २०२४ मध्ये त्याहून दुप्पट म्हणजे ९,५०० कोट्यधिश लोक ब्रिटन सोडतील असा अंदाज या संस्थेने वर्तविला आहे. २०२२ मध्ये ग्रेट ब्रिटनमधून १,६०० करोडपतींनी विदेशात स्थायिक होणे पसंत केले आहे.

जगात चीनमधून यंदाच्या आर्थिक वर्षात सर्वाधिक १५,२०० कोट्यधिश लोक देश सोडतील असा अंदाज आहे. सन २०२३ या आर्थिक वर्षात चीनमधून १३,८०० कोट्यधीशांनी देश सोडला होता. भारत या यादीत ग्रेट ब्रिटननंतर तिसरा देश आहे. भारतातून २०२३ मध्ये ५,१०० करोडपतींनी आपला गाशा गुंडाळला आहे. तर यंदाच्या आर्थिक वर्षांत ४,३०० करोडपती देश सोडतील असा अंदाज आहे. त्यानंतर दक्षिण कोरीयातून १,२०० करोडपती गाशा गुंडाळतील असा अंदाज आहे. साल २०२३ मध्ये ८०० करोडपती परदेशात वसले आहेत.

गेल्यावर्षी अमेरिकेने रेकॉर्डब्रेक १,४०,००० विद्यार्थ्यांना स्टुडण्ट व्हीसा मंजूर केला होता. दूतावासातील अधिका-यांनी दिलेल्या माहीतीनूसार यंदा गेल्यावर्षी एवढेच किंवा त्याहून अधिक स्टुडण्ट व्हीसा यंदा जारी करणार असल्याचे स्टुडंट व्हीसा डे निमित्त अमेरिकन दुतावासाने म्हटले आहे. त्यामुळे अमेरिकेत शिक्षणासाठी जाणा-या भारतीयांना फायदा होणार आहे. भारतातील अमेरिकन मिशनने देशभरात ८ वा वार्षिक ‘स्टुडंट व्हीसा डे’ नुकताच साजरा केला. नवी दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईतील दुतावास अधिका-यांनी विद्यार्थी व्हीसासाठी आलेल्या उमेदवारांच्या यावेळी मॅरोथॉन मुलाखती घेतल्या.

१० वर्षांत १७ लाख कुटूंबाचे स्थलांतर - 
गेल्या १० वर्षात १७ लाख कुटुंबे देश सोडून परदेशात कायमचे स्थायिक झाल्याचे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक प्रचारात म्हटले होते. ही सर्व कुटुंबे हिंदू असल्याचाही दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पाच वर्षांचे सरकार दिले तर आणखी हिंदू कुटुंबांचे देशातून स्थलांतर होईल, असाही आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad