नवी दिल्ली - आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि टेक्नॉलॉजीमधील बदलते स्वरुप यामुळे २०३४ सालापर्यंत ९ ते ५ वाजताच्या नोकऱ्या संपुष्टात येतील. कामाचे तास आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेमध्ये बदल होऊ शकतात. नव्या टेक्नोलॉजीमुळे काम करण्याची पद्धत बदलली जाणार आहे, असा खळबळजनक दावा लिंक्डइनचे सहसंस्थापक हॉफमॅन यांनी केला.
भारतीय अमेरिकी उद्योजक नील तपारिया यांनी हॉपमॅन यांच्या भविष्यवाणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओसह त्यांनी एक पोस्ट लिहिली, त्यात तुमची ९ ते ५ नोकऱ्या संपुष्टात येणार आहे. २०३४ सालापर्यंत सर्व नोकऱ्या संपुष्टात येतील. त्यांनी पोस्ट करत हॉफमॅन यांच्या विधानाचा संदर्भ दिला. या पोस्टला आतापर्यंत १७ मिलियन्स जणांनी पाहिले असून ६१ हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हॉफमॅन यांची भविष्यवाणी खऱ्या ठरतात, असे सांगितले जाते.
हॉफमॅन यांनी १९९७ साली सोशल मीडियाविषयी भविष्यवाणी केली होती. त्यावेळी अनेकांना कल्पनाही नव्हती की, सोशल मीडिया हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग होईल. आर्टिफिशियल इंटेलिजेंस मुळे क्रांती येईल. लोक भविष्यात नवी अर्थव्यवस्था निर्माण करतील, असे त्यांनी म्हटले होते. त्यांची भविष्यवाणी आता सत्यात उतरू लागली आहे. हॉफमॅन यांनी केलेल्या या तीन भविष्यवाणी खऱ्या झाल्याची आठवण तापरिया यांनी करून दिली.
No comments:
Post a Comment