गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करू, मुख्यमंत्र्यांची घोषणा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करू, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Share This

पंढरपूर - विशाळगडावरील अतिक्रमणावरून वाद झाला, त्यानंतर राज्यातील गडकिल्यांवरील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित झाला आहे. याप्रकरणी सर्व गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करू अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. विशाळगडावरील विस्थापितांचे योग्य प्रकारे पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्रीनी दिली.

विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे. कोणताही दुजाभाव न करता अतिक्रमणावर कारवाई केली जात आहे. आतापर्यंत एकूण १०० अतिक्रमण काढण्यात आली असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली. विशाळगडाप्रमाणेच राज्यातील इतर गडावरील अतिक्रमण काढून गड किल्ले अतिक्रमणमुक्त केले जातील असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages