अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 July 2024

अंगावर झाड कोसळून एकाचा मृत्यू


मुंबई - सोमवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वरळी बीडीडी चाळ जांभोरी मैदान येथे अमित जगताप (४५) यांच्या अंगावर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले असता, त्यांना उपचारासाठी परळ येथील ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सायंकाळी ५.४० वाजता त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबईत पावसाची हळूवार एंट्री झाल्यापासून पडझडीचे सत्र सुरूच आहे. घर अथवा घराचा भाग कोसळणे, झाड, झाडांच्या फांद्या कोसळणे अशा घटनांचे सत्र सुरूच आहे. यंदाच्या पावसांत झाडे पडण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी वरळीच्या जांभोरी मैदानाजवळ, बीडीडी चाळ क्रमांक १९ जवळ रस्त्याच्या बाजूला असलेले झाड सोमवारी सकाळी अचानक कोसळून तेथे असलेले अमित जगताप (४५) हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad