मस्करी करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मस्करी करताना तिसऱ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

Share This

ठाणे / डोंबिवली - मित्रासोबत मस्करी करताना एका महिलेचा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. डोंबिवली कल्याण शीळफाटा रोडवर ही घटना घडली. नगीनादेवी मंजिराम असे या मृत महिलेचे नाव आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

नगीनादेवी मंजिरा पिसवली टाटा नाका परिसरात आपल्या कुटुंबासह राहत होती. डोंबिवली पूर्व कल्याण शीळ रोडवर विकास नाका परिसरात ग्लोब स्टेट नावाची इमारत आहे. या इमारतीमधील एका कार्यालयात नगीनादेवी सफाईचे काम करते. मंगळवारी दुपारच्या सुमारास नगीनादेवी तिच्या सहकाऱ्यांसोबत इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याजवळ बसली होती. तिचा सहकारी तिच्यासोबत मस्करी करत होता. सहकाऱ्याचा हात लागताच तोल गेल्याने नगीनादेवी तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडली. त्यात नगिनादेवीचा मृत्यू झाला. तिला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी तक्रार नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages