
नवी मुंबई - राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. पुणे, मुंबईनंतर अनेक जिल्ह्यात अशा घटना निदर्शनास आल्या आहेत. त्यानंतर आता नवी मुंबईतील वाशी सेक्टर ९ मध्ये अशीच एक हिट अँड रनची घटना घडली आहे. दुपारच्या वेळी साईनाथ स्कूल समोर एका निळ्या रंगाच्या इनोव्हा कारच्या चालकाने दोन कार आणि एका ऑटोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ऑटो चालकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. दरम्यान, सध्या ही इनोव्हा कार पोलिसांच्या ताब्यात असून या घडलेल्या भीषण अपघाताबाबत वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.

No comments:
Post a Comment