मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील चार माजी नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा दिला. हे चारही माजी नगरसेवक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची स्थापन केलेल्या शिवसेनेत अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली. ४० आमदारांना घेऊन शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळवले. निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदे यांच्याकडील संघटनेला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह दिले. याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित आहे.
शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह ठाकरे यांच्याकडून गेल्यावर मुंबईमधील अनेक माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा राजीनामा दिला. आतापर्यंत मुंबईमधील ६० माजी नगरसेवकांनी शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केला. त्यानंतर आता मुंबई महापालिकेत विविध समित्यांवर काम केलेले भास्कर खुरसंगे, रिद्धी खुरसंगे, संजय शिंगणे, गीता शिंगणे या चार माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या पक्षाचा राजीनामा दिला. या चारही माजी नगरसेकांनी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
No comments:
Post a Comment