मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत पावसामुळे जनजीवन विस्कळीत

Share This

 

मुंबई - गेल्या 2 दिवसांपासून मुंबईसह उपनगरातील अनेक भागात पावसाचे पाणी साचले आहे. मुंबईतील वाहतूक सेवेवरही याचा किंचितसा परिणाम जाणवत असून मुंबई लोकल काही मिनिटं उशिराने धावत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मुंबईतील वाडिया आणि के.ई.एम. रुग्णालयात जे रुग्ण या हॉस्पिटलमध्ये येत आहेत, त्यांना आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील याचा फटका बसत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातही सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पश्चिम उपनगरात विलेपार्ले, पश्चिम परिसरात दादाभाई रोड आणि S.V रोड पाण्याखाली गेला आहे. विलेपार्ले पूर्व आणि पश्चिमला जोडणारा कॅप्टन गोरे उड्डाणपूल खालील पश्चिम परिसरात दादाभाई रोड रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. पश्चिम उपनगरात जोरदार पाऊस सुरू असून पाणी पातळीत अजून वाढ झाली तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला जाण्याची शक्यता आहे.

मुंबईत होत असलेल्या पावसाचा जोर लक्षात घेता, समुद्रकिनारी जाऊ नये, गरज असेल तरच घराबाहेर पडा. कृपया काळजी घ्या आणि गरज पडल्यास 100 नंबरवर संपर्क करा, असे आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

दरम्यान, मुंबईत गेल्या 3 दिवसांत 326 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर, 20 जुलै रोजी कोलाबा येथे 111 मिमी तर सांताक्रुझ येथे 93 मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटकोपरच्या भटवाडी कातोडी पाडा येथे दरड कोसळली, सुदैवाने कोणी जखमी नाही, काही घरांना मोठा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages