दीड लाख प्रवाशांना एक्स्प्रेसमधून खाली उतरवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दीड लाख प्रवाशांना एक्स्प्रेसमधून खाली उतरवले

Share This

मुंबई - कन्फर्म तिकिटाशिवाय मेल-एक्स्प्रेसच्या आरक्षित डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याची धडक मोहीम मध्य रेल्वेने हाती घेतली आहे. त्यानुसार आरक्षित तिकीटशिवाय मेल-एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात गेल्या दिड महिन्यात १ लाख ६० हजार प्रवाशांना मेल, एक्सप्रेसमधून खाली उतरविण्यात आले आहे.

रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार, मध्य रेल्वेने मेल एक्स्प्रेसचे आरक्षण नसताना आरक्षित डब्यांमधून प्रवास करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार मध्य रेल्वेने आरक्षित डब्यातून प्रवाशांना खाली उतरविण्याची मोहीम १४ जून पासून सुरू केली आहे. या कारवाईनुसार, गेल्या दिड महिन्यात १ लाख ६० हजार प्रवाशांना मेल / एक्सप्रेसमधून खाली उतरविण्यात आले आहे. सुरुवातीला एका दिवसांत १ हजार ७०० प्रवाशांना रेल्वे गाड्यांतून खाली उतरविण्यात आले होते. दिड महिन्यांपासून मुंबई विभागात ही कारवाई करण्यात येत आहे.

सोशल मीडियावरून रेल्वेकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. या तक्रारीमध्ये आरक्षण डब्यांत वेटिंग तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे उर्वरित प्रवाशांना त्रास होत असल्याचे नमूद करण्यात आले होते. आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शौचालयासह डब्यांतून ये-जा करण्यास त्रास होत होत होता. या तक्रारी दाखल झाल्यानंतर रेल्वेकडून ही कारवाई हाती घेण्यात आली आहे.

लोकल तिकिटावर मेल/एक्सप्रेसमधून प्रवास -
बहुतांशी प्रवासी लोकल तिकिटावर कर्जत, कसारा, कल्याणपर्यंत मेल/एक्स्प्रेसमधून प्रवास करीत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी होत्या. मध्य रेल्वेने २९ मेल/एक्स्प्रेसमध्ये ही कारवाई करत सुमारे १७०० प्रवाशांना खाली उतरविण्यात आले.

वेटिंग तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास -
तिकीट खिडकीवर काढलेले तिकीट वेटिंग आले, तरी बहुतांश प्रवासी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. अशा प्रवाशांना टीसीकडून आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास परवानगी देण्यात येत होती; मात्र अनारक्षित तिकिटावर आरक्षित डब्यातून प्रवास करता येणार नसल्याची उद्घोषणा रेल्वे स्थानकांवर करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages