म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी झाल्या - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2024

म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी झाल्या


मुंबई - म्हाडाच्या मुंबई मंडळाने 2030 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरणा प्रक्रिया 9 ऑगस्टपासून सुरू झाली आणि अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबर आहे. याचदरम्यान आता गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी म्हाडाच्या घरांसाठी अर्ज सादर करण्यास आता 19 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला. तसेच या घरांची किंमत 10 ते 25 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची घोषणा मंत्री अतूल सावे यांनी केली आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Mhada) पुढील महिन्यात मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. 9 ऑगस्टपासून घरांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 4 सप्टेंबरपर्यंत असणार आहे. पण मध्यंतरी लॉटरी ॲप नीट काम करत नसल्याने आणि खूपच कमी अर्ज आल्यानं आता म्हाडानं नोंदणीला मुदतवाढ दिली असून घरांच्या किंमतीही कमी केल्या आहेत. गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी याची घोषणा केली.

अर्ज भरण्याची प्रक्रिया 9 ऑगस्टपासून सुरू झाली आहे. मात्र गेल्या 17 दिवसांत म्हाडाच्या 2030 घरांसाठी केवळ 14839 लोकांनी अर्ज करून अनामत रक्कम जमा केली आहे. म्हाडाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अर्जांची संख्या कमी लक्षात घेता नोंदणीच्या तारखेला 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली.

19 सप्टेंबरपर्यंतची मुदतवाढ
म्हाडा 2030 घरांसाठी लॉटरी काढणार आहे. मुंबईतील गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड भागात ही घरे उपलब्ध आहेत. म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ४ सप्टेंबर होती.. त्याला आता मुदतवाढ दिल्यानं म्हाडाच्या घरांसाठी 19 सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. तसंच सोडतीची तारीखेतही बदल होणार असून ही तारीख नंतर जाहीर केली जाणार आहे, असं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं आहे.

अतुल सावे म्हणाले, “सरकार म्हाडाच्या लॉटरीतील घरांच्या किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी करणार आहे. विविध पुनर्वसन प्रकल्पांतर्गत विकासकांकडून म्हाडाला मिळालेल्या घरांच्या किमती कमी केल्या जाणार आहेत. याचा लाभ मुंबई म्हाडा लॉटरी 2024 मध्ये देखील होणार आहे. 33(5) आणि 33(7) अंतर्गत करण्यात आलेल्या योजनांमधील घरे विकासकांकडून म्हाडाला मिळालेली आहेत या घरांच्या किंमती कमी होणार आहेत”. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2024 च्या सोडतीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 359 सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी 627 सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी 768 सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी 276 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad