मुंबई - मालवण येथील ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळाल कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. आज महाविकास आघाडीकडून मालवण बंदची हाक देण्यात आली. याचपार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते राजकोटला किल्ल्यावर पोहोचले आहेत. त्यावेळी नारायण राणे आणि नीलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह राजकोट किल्ल्यावर पोहोचले असता, त्या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. भाजपाच्या या राजकारणाविरोधात महाविकास आघाडीकडून सरकारविरोधात जोडो मारो आंदोलन करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सिंधुदुर्गातील राड्यानंतर महाविकास आघाडीचे शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत सरकारविरोधात संताप व्यक्त केला.उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यातलं सरकार हे महाफुटीचं सरकार आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे आणि कारभाराने किळस आणली आहे. आम्ही तीन दिवसांपूर्वी महाराष्ट्र बंद केला होता. पण न्यायालयाच्या माध्यमातून त्यावर बंदी घातली गेली. मालवणमध्ये पुतळा कोसळल्यानंतर त्या घटनेचा निषेध करण्यासाठी आमच्याकडून मोर्चा करण्यात आला. मात्र त्या मोर्चात मोदी आणि शहांचे दलाल आणि शिवद्रोही आडवे आले. ते शिवद्रोही आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
सरकारने आपल्या बेफिकीरपणामुळे पुतळा उभारला असून त्याचे परिणाम निर्लज्जपणे भोगावे लागणार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तत्कालीन राज्यपाल कोश्यारी यांनी स्वतः शिवाजी महाराजांचा अपमान केला असता. पण कोश्यारीची टोपी वाऱ्याने उडाली असं कळलं नाही. गद्दार केसरकर म्हणाले, ‘काही तरी चांगल घडेल. त्यामुळी आम्ही आता ठरवलं आहे की, 1 सप्टेंबर रोजी दुपारी 11 वाजता हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून शिवाजी महाराजांचा पुतळा असलेल्या गेटवर जाऊन जोडे मारो आंदोलन करत सरकारचा निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, तुम्ही गुन्हा दाखल करणार असाल, याचा अर्थ तुम्ही गुन्हा घडला हे मान्य आहे. मग गुन्हेगार कोण? मोदी आले त्यांचे हस्ते अनावर झालं, याचा अर्थ त्यांचा संबंध आला. पण नौदल आपलं एवढं पोकळ आहे का? ते समुद्राशीच खेळत असतात. त्यामुळे जबाबदारी टाकून नौदलावर टाकून मोकळे होणार आहात का? किती वेगाने वारे वाहणार हे नौदलाला माहीत नव्हतं का? खरं तर निवडणूका होत्या आणि कोकण जिंकायचं यासाठी हा घाट घातला, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.
No comments:
Post a Comment