प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रकाश आंबेडकर रुग्णालयात दाखल, आयसीयूमध्ये उपचार सुरू

Share This

मुंबई - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांना छातीत दुखू लागल्याने गुरुवारी पहाटे (३१ ऑक्टोबर) पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. (Prakash Ambedkar admitted to hospital)

बाळासाहेब आंबेडकर यांच्या हृदयात रक्ताची गुठळी झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, येत्या तासाभरात त्यांची अँजिओग्राफी करण्यात येणार आहेत. कुणीही प्रश्न विचारून व्यत्यय आणू नये. कुटुंबाच्या गोपनीयतेच्या विनंतीचा आदर करावा, अशी विनंती आंबेडकर कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे.

पुढील ३ ते ५ दिवस बाळासाहेब डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर, निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती आणि माध्यम आणि संशोधन विभागाच्या सहकार्याने पुढील काही दिवस वंचित बहुजन आघाडीच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages