राज्यात आजपर्यंत ३२५९ उमेदवारांचे ४४२६ नामनिर्देशन पत्र दाखल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 October 2024

राज्यात आजपर्यंत ३२५९ उमेदवारांचे ४४२६ नामनिर्देशन पत्र दाखल


मुंबई - महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ मतदारसंघासाठी निवडणुकीकरिता २८ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ३ हजार २५९ उमेदवारांचे ४ हजार ४२६ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत अशी माहिती, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता १५ ऑक्टोबर २०२४ पासून लागू झाली असून २२ ऑक्टोबर २०२४ रोजी निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. नामनिर्देशन पत्र भरणे सुरु असून मंगळवार, दि. २९ ऑक्टोबर ही नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या अर्जांची ३० ऑक्टोबरला छाननी करण्यात येऊन ४ नोव्हेंबर २०२४ रोजी अर्ज मागे घेता येईल. मतदान २० नोव्हेंबरला होत असून २३ नोव्हेंबर २०२४ रोजी मतमोजणी होणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS