Western Railway - ट्रेनमधून अधिक वजनाचे सामान नेल्यास होणार कारवाई! - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

Western Railway - ट्रेनमधून अधिक वजनाचे सामान नेल्यास होणार कारवाई!

Share This


मुंबई - लोकलमधून (Local Train) प्रवास करणाऱ्यांसाठी रेल्वे रेल्वे डब्यांच्या श्रेणीनुसार ३५ ते ७० किलो सामान प्रवासी डब्यातून नेण्यास परवानगी दिली आहे. मात्र याचा कित्येकजण गैरफायदा घेत ७० किलोहून अधिक वजनाचे सामान (Overweight luggage) घेऊन प्रवास करतात. याची अडचण इतर प्रवाशांना होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याबाबत कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

पश्चिम रेल्वेने (Western Railway) लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये जास्त वजन घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या नियमांनुसार १००×१००×७० सेमीपेक्षा अधिक आकाराचे आणि ७५ किलोपेक्षा अधिक वजनाचे सामान प्रवासी डब्यातून नेताना आढळल्यास प्रवाशांवर तत्काळ दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 

वांद्रे टर्मिनसमध्ये चेंगराचेंगरीची घटना घडल्यानंतर रेल्वे स्थानकातील गर्दी नियोजनासाठी पश्चिम रेल्वेने विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे नियमापेक्षा जास्त वजनाचे आणि आकाराच्या सामानांसाठी मेल-एक्स्प्रेसच्या मालडब्यांची सुविधा आहे. प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages