दिवाळी संपली तरी एसटी कर्मचारी दिवाळी भेट रक्कमे पासून वंचित - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिवाळी संपली तरी एसटी कर्मचारी दिवाळी भेट रक्कमे पासून वंचित

Share This

 

मुंबई - निवडणुक आचारसंहितेपूर्वी एसटी कामगारांना मंजूर करण्यात आलेली दिवाळी भेट रक्कम तात्काळ देण्यासाठी निवडणुक आयोगाने संमती द्यावी अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

एसटी कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी ५२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा असे पत्र एसटी प्रशासनाने १५ ऑक्टोंबर रोजी सरकारकडे पाठवले होते. त्याला सरकार कडून हिरवा कंदील मिळाला नाही.त्या नंतर लगेचच आचार संहिता लागू झाल्याने सदरची रक्कम देण्यात अडचण निर्माण झाली.व कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाल्याने एसटी प्रशासनाने ८ नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाकडे पत्र लिहून सदरची रक्कम आपल्याकडील निधीतून वितरित करण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती केली.

मात्र या पत्रावर तब्बल सहा ते सात दिवस उलटूनही कोणताच निर्णय घेण्यात आला नाही.त्या मुळे आजतागायत एसटी कर्मचारी दिवाळी भेटीपासून वंचित राहिले आहेत. वाढत्या महागाई मुळे कर्मचारी त्रस्त झाले असून सदरची रक्कम कामगारांना देण्यासाठी निवडणुक अडचण नसावी. कारण एसटी कर्मचारी हे कुठल्याही विशिष्ट मतदार संघात एकवटलेले नसून राज्यभर विखुरलेले आहेत.तसेच विधानसभा मतदार संघातील एकूण मतदारांच्या तुलनेत त्यांची संख्या नगण्य आहे. याचा विचार करता निवडणुक आयोगाने तात्काळ संमती द्यावी अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages