भाजपच्या विनोद तावडेंचा पैसे वाटतानाचा व्हीडिओ व्हायरल - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 November 2024

भाजपच्या विनोद तावडेंचा पैसे वाटतानाचा व्हीडिओ व्हायरल


मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर विरारमध्ये जोरदार राडा झाला. भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे (Bjp Vinod Tawade) यांनी पैसे वाटल्याचा (Money Distribution) आरोप त्यांच्या विरोधकांकडून करण्यात आला. तसा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकारानंतर विरोधी बहुजन विकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. (Latest Political News) (BJP's Vinod Tawde distributing money)

विरारमध्ये सध्या भाजप विरूद्ध बहुजन विकास आघाडीत लढत पाहिला मिळत आहे. या ठिकाणी भाजपकडून राजन नाईक हे निवडणूक लढवत आहेत. तर हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच मतदारसंघात तावडेंकडून पैसे वाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. विनोद तावडे असलेल्या नालासोपा-यातील विवांत हॉटेलमधील केवळ रूम नंबर ४०७ मध्ये नऊ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून प्रत्येक रूमची पंचनामा करण्याची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. एकूण पाच कोटी रुपये आणले असल्याच्या दावा करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये बविआ कार्यकर्त्यांनी घेरल्याने विनोद तावडे यांना बाहेर पडणे अडचणीचे झाले. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कर्मचा-यांना कारवाई करणे भाग पडले.

दरम्यान, पैसे वाटल्याचे दिसत असल्याने बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी तावडेंना रोखून धरले होते. इतकेच नाहीतर तावडेंना बाहेर पडण्यासही जोरदार विरोध केला. असे असताना ‘विनोद तावडे यांचे मला 25 फोन आले. त्यांनी जाऊ द्या, मला माफ करा’, असे म्हटल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले. मात्र, तावडे यांनी त्यांच्यावरील सर्व आरोपांचं खंडन केलं.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad