विधानसभा निवडणुकीत नेमक्या कोणाला किती जागा मिळाल्या? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विधानसभा निवडणुकीत नेमक्या कोणाला किती जागा मिळाल्या?

Share This

मुंबई - राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा (VidhanSabha Election 2024 Result) निकाल लागला आहे. या निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. (Maharashtra Vidhansabha Election 2024 result)

राज्यात एकूण 288 जागांसाठी मतदान झाले. यातपैकी तब्बल 132 जागांवर भाजपाने दणदणीत विजय नोंदवला आहे. या जागांसह भाजपा हा राज्यातील सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. सलग तिसऱ्या निवडणुकीत भाजपाने 100 पेक्षा अधिक जागा मिळवल्या आहेत. या निवडणुकीत भाजपानंतर एकनाथ शिंदे यांचा पक्ष दुसरा सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे. या पक्षाला एकूण 57 जागा मिळाल्या आहेत. तर अजित पवार यांच्या पक्षाला एकूण 41 जागांवर विजय मिळाला आहे.

या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने पूर्ण ताकद लावली होती. शरद पवार यांच्यासारखे नेते संपूर्ण राज्यात फिरले होते. मात्र महाविकास आघाडीला म्हणावे तसे यश आले नाही. महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाला अवघ्या 16 जागा मिळाल्या. तर शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला एकूण 20 जागा मिळाल्या.

दरम्यान, राज्यात महायुतीचे सरकार येणार, हे स्पष्ट झाल्यामुळे आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत महायुतीमध्ये लबतं चालू झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा येत्या 25 नोव्हेंबर रोजी शपथविधी होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महायुती- 230
---------------------
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41

मविआ- 46
---------------------
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages