कोकण रेल्वे, कोळी, पोलीस दलासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी केल्या ' या ' मागण्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कोकण रेल्वे, कोळी, पोलीस दलासाठी खासदार रविंद्र वायकर यांनी केल्या ' या ' मागण्या

Share This

नवी दिल्ली - कोकण रेल्वेच्या (Konkan Railway) स्थानकांची दुरुस्ती, देखभाल व नूतनीकरण करण्यासाठी, कोळी बांधवाना (Koli Fisherman) अनुदान, तसेच मुंबई पोलीस (Munbai Police) दलाला आधुनिक शस्त्र उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रविंद्र वायकर (MP Ravindra Waikar) यांनी सोमवारी पुरवणी माणग्यांवर बोलतांना केली.  

२०२४-२०२५ च्या पुरवणी मागण्यांवर लोकसभेत सोमवारी चर्चा उपस्थित करण्यात आली होती. या पुरवणी मागण्यांवर आपले विचार मांडताना खासदार रविंद्र वायकर यांनी मुंबई, महाराष्ट्र तसेच लोकसभा क्षेत्राच्या विकासाचे काही विषय मांडून निधीची मागणी केली. यात मुंबई एयरपोर्टवर नवीन रनवे तसेच एयरपोर्टचा विस्तार करणे, महाराष्ट्रातील प्रत्येक गावात दूरसंचार नेटवर्कच्या माध्यमातून  जोडण्यात यावे, मुंबईत विशेष न्यायालय उभारणे, मुंबई पोलिसांना आधुनिक शस्त्रास्त्र देण्यासाठी राज्य सरकारला निधी देण्यात यावा, सागरमाला योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी जावळील सगळ्या बंदरांचा विकास करणे, मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण करणे, कोकण रेल्वेच्या स्थानकाची दुरुस्ती, देखभाल तसेच नूतनिकरण करणे, मुंबई व कोकणातील मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांना अनुदान देण्यात यावे तसेच मुंबईत नवीन रुग्णालय व जुन्या रुग्णालयाच्या देखभाल दुरस्तीसाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी खासदार वायकर यांनी लोकसभेत केली.




No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages