एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार

Share This


मुंबई - एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबतचं पत्र राजभवनात देण्यात आलं आहे. शिवसेनेचा शिष्टमंडळ काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलं त्यानंतर त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन एक पत्र दिलं आहे. त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. (Political News)

आज साडेपाच वाजता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. आम्ही शिवसेनेच्यावतीने सर्व आमदारांनी, माजी मंत्र्यांनी, एकनाथ शिंदे यांना कळकळीची विनंती केलेली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदी गेले पाहिजे, त्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात काम करण्यासाठी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील सरकारमध्ये असले पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका होती आणि मला सांगताना आनंद होत आहे, शिवसेनेचे सर्व आमदार आणि नेते महायुतीचे सर्व नेते, आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विनंती केलेली होती. या सर्वांच्या विनंतीला आणि इच्छेला मान देऊन उपमुख्यमंत्री पद घेण्याचं एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठीच्या शिफारसीचे पत्र घेऊन राजभवन येथील सचिव आहेत प्रवीण दराडे यांच्याकडे दिलेलं आहे. आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन, आम्ही इच्छा व्यक्त केली होती त्याचे मान राखून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचं मान्य केलं आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages