विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

विकास ढाकणे यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती

Share This

मुंबई - पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उल्हासनगरमधील पायाभूत सुविधांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणणारे उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांच्यावर महाराष्ट्र सरकारने मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांच्या कामाची दखल घेत त्यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात उपसचिव पदावर नियुक्ती केली आहे.

विकास ढाकणे हे 2008 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अर्थशास्त्रात मास्टर केले आहे. पायाभूत सुविधांचा 'ॲक्शन मॅन' म्हणून त्यांना ओळखले जाते. ढाकणे हे महाराष्ट्राच्या कारभारातील व्यापक अनुभवासाठी प्रसिद्ध आहेत. विकास ढाकणे यांना उल्हासनगरमध्ये सर्वसमावेशक बदलांसाठी आणण्यात आले होते. मात्र राज्यातील पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यासाठी सरकारने त्यांची उपमुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती केली आहे. त्यांनी नुकताच उल्हासनगरच्या आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारला होता, त्यांनी शहराच्या विकासासाठी सर्वसमावेशक बदल घडवून आणत मिशन 50 सुरू केले होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages